ग्रामीण युवकांच्या मनातील हळवं प्रेम व त्याचं भावविश्व कसं असतं हे कवी शरद पाटील यांनी ‘नातं तुझं माझं’ या संग्रहातून अचूकपणे उलघडलेलं आहे.
- काही क्षण तुझे हात, हातामध्ये राहिले होते
मुके झाले शब्द आणि डोळे भरून वाहिले होते.
- कुणी जपतं फुलांना, कुणी जपतं पानांना
मी मात्र जपत आहे, कोमेजलेल्या मनांना
- नऊवारीत गोड हसताना, जेंव्हा तुला पाहिलं होतं
तू खूप सुंदर दिसतेस हेच सांगायचं राहीलं होतं
- मनामध्ये जिद्द असते, पंखामध्ये बळ असतं
उंच भरारी घेण्यासाठी, एवढंच पुष्कळ असतं
या आणि अशा अनेक हृदयस्पर्शी चारोळ्यांची मांडणी या संग्रहात केलेली आहे.
Keywords : Sharad Patil ǀ Marathi Charoli ǀ Marathi Charoli Sangrah ǀ Marathi Charolya






Reviews
There are no reviews yet.
Write a customer review