गझल हा जरी मूळचा फार्सी काव्यप्रकार असला, तरी तो हाताळण्याचे प्रयत्न मात्र मराठीत फार पूर्वीपासून व फार मोठ्या प्रमाणात होत आलेले आहेत. अमृतराय (जन्म इ. स. १६९८, मृत्यू इ.स. १७५३) माधव जूलियन (जन्म २१ जानेवारी १८९४, मृत्यू २९ नोव्हें १९३९) सुरेश भट (जन्म १५ एप्रिल १९३२, मृत्यू १४ मार्च २००३) हे ह्या प्रयत्नाच्या वाटचालीमधील तीन महत्त्वाचे कवी – गझलकार होत. सुरेश भटांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून मराठीत अनेक गझलकार उदयास आले, नावरूपास आले. तुकाराम पाटील हे त्यापैकी एक होत. त्यांनी संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या लक्षणीय गझल लिहिली आहे. मात्र त्यांच्या गझलेकडे गझलप्रेमींचे, विशेषतः रसिकांचे व अभ्यासकांचे म्हणावे तेवढे लक्ष गेलेले दिसत नाही. म्हणून ह्या गुणी असूनही काहीशा दुर्लक्षित, उपेक्षित राहिलेल्या गझलकाराच्या निवडक गझलांचे संपादन योजिले आहे.
Keywords : Editor: Dr. Avinash Sangolekar ǀ Trimurti Prakashan ǀ Marathi Gazal ǀ Marathi Gazal Sangrah ǀ Marathi Gajal ǀ Marathi Ghazal


















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review