अक्षर म्हणजे अविनाशी किंवा अपरिवर्तनशील. अशी लिपी लाभलेल्या मराठी वाड्मय क्षेत्रातील निवडक वाड्मय प्रकारांच्या साहित्यकृतींचा मोकळा रसास्वाद या पुस्तकात आहे; ज्यातून सर्वकष रसिकवृत्ती दिसते. यातून हेही लक्षात येते की, चंद्रकांत पोतदार यांनी कुठल्याही इझमला बांधून घेतलेलं नाही. अध्यात्म भानाच्या साहित्यकृतीचं त्यांना वावडं नाहीय की सामाजिक भानाच्या, ग्रामी भानाच्या साहित्यकृतीचंही वावडं नाहीय. अलीकडे तुच्छतावादी दृष्टिकोन फोफावला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ पाहता यात तुकारामांबरोबर गदिमा आहेत तसे इंदिरा संत, ग्रेस ते थेट गिरीश कर्नाडही आहेत. तुकारामांचा कवी म्हणून विचार करताना प्रपंच, अध्यात्म, प्रबोधन हे तीन आयाम, गदिमांच्या गीतांमधले दार्शनिक अलोकिकत्व, इंदिरा संतांच्या कवितेवरील लेखाचे शीर्षकच सारं काही बोलून जातं, दु:खाचा खोपा विणणारी कवयित्री. कृ. ब. निकुंब या अलक्षित कवीचा समावेश म्हणजे निकुंबांच्या संपन्न काव्यात्मक आणि जीवनव्यापी चिंतनाला (समस्त मराठी साहित्य रसिकांच्या वतीने) केलेला सलाम आहे. ग्रेसच्या कवितेतील दु:खाचे वैभव महत्त्वाचे आहे. कविता, जागतिकीकरण, ग्रामजीवन, मातृप्रतिमा, श्रमिक शेतकरी याबरोबर गिरीश कर्नाड यांचे नाट्य लेखन अशा आशयविषयांचा समावेश यात आहे. अशी चौफेर पसरलेली सखोल रसिकवृत्ती पाहन चकित व्हायला होतं, कारण या सर्व लेखनाला स्वत:च्या जीवनजाणिवांचा भक्कम पाया आहे. स्वत:च्या आकलनाला महत्त्व दिल्यामुळे हे सर्व लेखन निव्वळ अकादमिक स्वरुपात गणलं जाऊ शकणार नाही. या अवघ्या लेखनाला चंद्रकांत पोतदार यांच्या जगण्याचे आयामही भिडतात आणि त्यातून निर्माण होणारी ठिणगी आपल्या मनात वैश्विक आशयाचा प्रकाश पसरवण्यास कारणीभूत ठरते. ‘अक्षरलिपी’ म्हणजे सच्ची आणि प्रामाणिक अशी सुद्ददगाथा आहे
Dr Chandrakant Patil, Samiksha books in Marathi, Lalit Publication, Marathi lekh Sangrah, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store








Reviews
There are no reviews yet.
Write a customer review