एखाद्या गोष्टी मागील कारण म्हणजे रहस्य. एखादी घटना घडल्या नंतर त्या मागील कारण समजले तर आपण ती घटना शक्यतो विसरून जातो. पण, कारण समजले नाही, तर मात्र आपण अस्वस्थ होतो. जो पर्यंत कारण समजतं तो पर्यंत आपली उत्सुकता राहते. ती घटनाही लक्षात राहते.
आपणही या कथा संग्रहात अशा अकल्पित कथा पाहणार आहोत, ज्या शेवट पर्यंत वाचल्या शिवाय त्या मागील कारण किंवा रहस्य उकलत नाही. वाचकाची उत्सुकता, अधीरता शेवट पर्यंत टिकविणे, वाचकाला जागी खिळवून ठेवने ही या कथांची वैशिष्ट्ये आहेत. तसेच संयम, देवावरील दृढ विश्वास, जीवनातील गोष्टींची अनिश्चितता, धाडस, संकटांना सामोरे जाण्याची मनाची प्रबल शक्ती, सहकार्य करण्याची भावना अशी अनेक गुणवैशिष्ट्ये या कथांमधून दिसून येतात. शिकायला मिळतात. असा हा रहस्य खजिना वाचकांना नक्की आवडेल…



















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review