निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांचा महिमा गावा तेवढा कमीच. त्यांच्या समाजसेवेचा वारसा प्रबोधनात्मक साहित्याच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित राहणे म्हणजेच कर्मयोगी संत गाडगेबाबांना व त्यांच्या कार्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली म्हणावी लागेल. विशेष म्हणजे सामाजिक परिस्थितीचे भान बाळगत संपादक महोदय सु.पु.अढाऊकर व सं. वि. साबळे यांनी ‘गाडगेबाबांच्या कविता’ ह्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाची निर्मिती करताना, पी. नंदकिशोर, अरूण मानकर, कृष्णा शिंदे, अनिला मुंगसे, निशा खापरे, रणजित पवार, प्रा. अशोक सारडा व भिमाजी ठोंगिरे यांसारख्या वेचक परंतु नामचीन कवींच्या कवितांचा व इतर समस्त कवींच्या कवितांचा समावेश केला आहे. या कविता गाडगेबाबांच्या कार्याचा परिचय भविष्यातील समाजास करून देण्यास उपयुक्त ठरतील यात शंकाच नाही. संपादक महोदयांनी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या स्मृती जागृत ठेऊन या प्रातिनिधिक कवितासंग्रहात समस्त कवींच्या कवितांना मानाचे स्थान देऊन कर्मयोगी संत गाडगेबाबांप्रति श्रद्धा समर्पित करण्याची मानाची संधीच प्राप्त करून दिली, असे म्हणावयास हरकत नाही. असा हा श्रद्धापूर्वक निर्मित कवितासंग्रह साहित्याच्या दालना- मध्ये नावलौकिक प्राप्त करेल…
Keywords : Gadgebabanchya Kavita ǀ S. P. Adhaukar, S. V. Sable ǀ Sahityavishwa Prakashan ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy


















1 review for गाडगेबाबांच्या कविता । Gadgebabanchya Kavita
There are no reviews yet.
Write a customer review