कथनात्मक साहित्य आशय अभिव्यक्तीचे नवीन आयाम शोधणारे जी. के.ऐनापुरे हे महत्त्वाचे लेखक. कथा आणि कादंबरी लेखनातून त्यांनी समकालिन समाज वास्तव नेमकेपणाने दृगोचार केले आहे. आपल्या लेखनातून त्यांनी जात-वर्ग स्त्रीदास्यान्ताची भूमिका घेतली आहे. व्यवस्था विद्रोह आणि सम्यक पुननिर्माण हे जी.के. ऐनापुरे यांच्या लेखनाचे सूत्र आहे. समाजभाव व आत्म चिकित्सा यांच्या आधारे ते सामाजिक द्वंद्वात्मकतेची नोंद घेताना कथानाधारे धर्म चिकित्सा करतात. मानवाच्या मूलभूत अंत: प्रेरणांच्या तटस्थपणे शोध घेतात. व्यक्ति मनाचे कंगोरे उलगडून दाखवतात. केवळ आशयाच्या पटलावर नव्हे तर अभिव्यक्तीचे नाविन्य त्यांच्याकडे आहे. भेदक शब्द प्रतिमा जशा ते वापरतात, तसाच काव्य प्रतिमांच्या आधारे दृश्यात्मक अनुभवही ते देतात. या स्वतंत्र साहित्यकृती असल्या तरी त्या एकसत्वी आहेत.
G K Ainapure, Gi Ke Ainapure, Dirgh Katha, story books in Marathi, Marathi Katha, Lalit Publication, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store, best marathi books to read, marathi books buy online, Marathi Pustak



















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review