निसर्गाची निरागसता निर्विवाद आहे. तो आपलं रंगरूप सतत बदलत असतो. बालपणापासून त्याच्याशी संवाद साधताना माणूस अंतर्मुख झाला, तर अवघ्या चराचरातील चैतन्य त्याच्या जीवनात खेळत राहतं. स्मरणशक्तीच्या लहरीपणाशी जुळवून घेता-घेता जे चिंतन होतं, ते कालांतरानं आरशाची भूमिका बजावतं; तरीही प्रश्नांकित मनाची अवस्था मोठी अस्वस्थ करते. आपण आपल्यासाठी अपूर्ण आहोत का, हा प्रश्न पुनः पुन्हा उत्तर शोधायला प्रवृत्त करत राहतो. त्यातूनच माणूस देहबुद्धीच्या पातळीवरून आत्मबुद्धीच्या पातळीवर जातो आणि नकळतपणे कविता करू लागतो; ती निःशब्द आराधना अक्षरांचं भांडार खुलं करते, अस्सल कविता कागदावर उतरते.
‘जाणिवांची आवर्तने’ या ग्रंथनामातच प्रस्तुत कवितांचं प्रतिबिंब उमटलंय, आपण ‘पाहतो’, कविता ज्याला सुचते, ती ‘जाणतो’, हा महत्त्वाचा आंतरिक फरक समजून घेताना वाचक ‘वाहव्वा’ म्हणतो. अशी कविता हृदयापासून प्रकट होते. रसिकाच्या हृदयाला जाऊन भिडते. याच प्रक्रियेला ज्ञानेश्वर म्हणतात, ‘हृदया-हृदय एक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले।।’
जाणिवांच्या सहस्रावर्तनांतून जीवाची एकाग्रता विश्वचैतन्याशी एकरूपतेनं वागते अन् कलावंत हळूहळू अधिक संवेदनशील होत जातो. या संग्रहातील कविता वाचताना याची प्रकर्षानं जाणीव होते आणि वाचक अगदी उत्स्फूर्तपणे ‘व्वा’ म्हणतो. बघणं आणि जाणवणं, यातला फरकही स्पष्ट होतो.
Keywords : Janivanchi Avartane ǀ Samrudhi Surve ǀ Sanvedana Prakashan ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy


















1 review for जाणिवांची आवर्तने । Janivanchi Avartane
There are no reviews yet.
Write a customer review