दलित कवितेच्या नव्या पर्वात अनेक दमदार कवी आपल्या अनुभवविश्वासह आविष्कृत होऊ लागले आहेत, ही खूप समाधानाची बाब आहे. यातच कवी समाधान गायकवाड यांची कविता तिच्या वेगळेपणाने उठून दिसते. ‘काळजातील काव्यप्रक्षेपण’ हे आगळेवेगळे शीर्षक या कवीच्या सर्जनशक्तीचा परिचय करून देते. कारण कवी फक्त कविता लिहू इच्छित नाही, तर त्यांचे प्रक्षेपण करतो. आजच्या बेगडी समाजव्यवस्थेला तिच्यातील विसंगतींचे दर्शन घडवू इच्छितो. हे काम तो या कवितांतून अगदी प्रामाणिकपणे आणि परखडपणे करतो. महापुरुषांच्या विचारांची जाणीव करून देऊन या भरकटलेल्या समाजजीवनाला दिशा देण्याचे काम या कविता करतात. स्वतः ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने ग्रामीण समाजजीवन व संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण समाधानच्या कवितांमधून जाणवते. तसेच नवीन पिढीबद्दलची अनेक मतेही तो स्पष्टपणे मांडतो. श्रमिक, कष्टकरी, तसेच वंचित, शोषित घटकांबद्दलची त्याची तळमळ त्याच्या शब्दाशब्दांमधून जाणवत राहते.
Keywords : Samadhan Gaikwad ǀ Yashodeep Publications ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poetry books ǀ Marathi Poem ǀ Dalit Kavita


















1 review for काळजातील काव्यप्रक्षेपण । kaljatil Kavyprakshepan
Write a customer review