न मारलेल्या गप्पा
नीट पाहिलं तर माणसाला हिंसेचं विशेष आकर्षण आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे माणसांना विकलं पण जातं. मग ते या OTT वरच्या मालिका असतील, किंवा रोजच्या मालिकांमध्ये मुख्य स्त्रीपात्राला कशा प्रकारे त्रास द्यायचा याचा कट रचणारे खलनायक, खलनायिका असोत किंवा आता २४ तास दिसणाऱ्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांतली हिंसा दाखवायला आतुर असलेले पत्रकार असोत किंवा अगदी टॉम अँड जेरी सारखं कार्टन असो. गाडी चालवताना आपल्या तोंडून पण शिव्या निघत असतात आणि प्रचंड उशीर जरी झाला असला तरी रस्त्यावरच भांडण थोडं तरी बघावंसं वाटतंच!
त्यात, “लोक आजकाल वाचत नाहीत, खासकरून तरुण पिढी तर नाहीच!’ अशा प्रकारची वाक्यं आपण खूपदा ऐकतो. या विधानामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे हे जाणकार सांगतीलच, पण मी स्वत: ते अनुभवतोय, आधी जितकी पुस्तकं वाचली जायची, लेख वाचले जायचे त्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याची जागा आता वेगवेगळ्या सिरीज (ज्या बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या पुस्तकावरच आधारित असतात), माहितीपट किंवा यूट्युबवरचे विविध व्हिडीओ यांनी घेतली आहे. आणि या सगळ्यात भर म्हणून अविश्वासाचं वातावरण आहे! आपला आवडता नेता आज नेमका कोणत्या पक्षात आहे आणि तो पुढच्या महिन्यात पण त्याच पक्षात असेल का याची शाश्वती नाही. आपल्या ऑफिसमध्ये वर्षानुवर्ष शेजारी बसणारी व्यक्ती नेमकी तशीच आहे का जशी ती दाखवते? सोशल मीडियावर तर खोटेपणाचा उदो उदो पण होतो.
असो. तर इतकी नकारात्मक सुरुवात का? कारण एखाद्या पिक्चरमध्ये कसं पहिले कशी वाईट परिस्थिती आहे, हे दाखवलं जातं, लोक कसे खंगलेले आहेत रोजच्या अत्याचाराला, आणि मग एक हिरो येतो आणि गोष्टी बदलायला लागतात. तो खलनायकाशी दोन हात करतो आणि सगळ्यांचं आयुष्य आनंदी बनवतो. आदित्य महाजन यांच ‘सकाळ’ वृत्तपत्रातलं ‘दुनियादारी’ हे सदर असं एक हिरो आहे. त्यातील लेखांचा संग्रह म्हणजे ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक होय.
N Marlelya Gappa, Na Marlelya Gappa, Na Maralelya Gappa, Aditya Mahajan, Unmesh Prakashan, Sanwad Lekhan, Sakal Newspaper madhil Duniyadari Sadaratil Lekhan, Marathi Best Dialogue book, Aditya Mahajan Marathi Book, Gappagoshti, Dialogue writing published in Duniyadari in Sakal newspaper, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store




















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review