निळू फुले
निळूभाऊ हे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक सुरेख स्वप्न होते. असा अष्टपैलू अभिनेता पुन्हा होणे खूपच कठीण आहे. त्यांचे स्थान अढळ आहे. अभिनयातील सहजता, आवाजातील चढउतार, नजरेतील धाक, चेहर्यावरील भाव, समाजातील व्यक्तींचे अचूक निरीक्षण, अफाट वाचन अशा अनेक अभिनय पैलूंनी भाऊंनी अनेक चित्रपट भूमिका अक्षरश: जिवंत केल्या , अजरामर केल्या. त्यांनी आपल्या अफलातून अभिनयाने मराठी प्रेक्षकांवर गारूड केले.
भाऊचा जन्म मध्यमवर्गीय माळी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचे बालपण संमिश्र वस्ती मध्ये गेले. त्यामुळे, लहानपणीच त्यांच्यावर धर्म निरपेक्षतेचे संस्कार झाले. तसेच, ते सेवादलाच्या शाखेत जात. त्यांच्या कलापथकात भाग घेत. येथेच त्यांच्यातील अभिनय गुण प्रकट होण्यास त्यांना संधी मिळाली. नाटकातही ते कामे करू लागले. त्यातूनच त्यांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेक नाटकात आणि अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला. काही हिंदी चित्रपटातही कामे केली. ती सर्व संस्मरणीय अशी होती, इतके मोठे अभिनेते असूनही त्याचे वागणे अतिशय साधे होते. त्यांना गर्व नव्हता, म्हणूनच ते सर्वांना जवळचे वाटले, ते अजातशत्रू होते. अभिनया बरोबरच त्यांची दुसरी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग, ते पहिल्या पासून शेवट पर्यंत सेवा दलात निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले. राम मनोहर लोहिया हे त्यांचे आदर्श होते. त्यांच्या विचारांशी ते एकनिष्ठ राहिले. निरपेक्ष आणि निःस्वार्थी समाज सेवा हे त्यांचे ब्रीद होते. समाज धर्म निरपेक्ष बनला पाहिजे, सुधारला पाहिजे अशी त्यांची विशुद्ध भावना होती. त्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभाग घेतला. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. गोवामुक्ती चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. , असे एकंदरीत भाऊंचे विविध रंगी व्यक्तिमत्व होते. असा अभिनेता लाखात एखादाच असतो.












Reviews
There are no reviews yet.
Write a customer review