‘पाऊस’ या तीनच अक्षरांमध्ये जगातलं सगळं काही सामावलेलं आहे. दुनियेतलं सगळं काही तुमच्या जवळ आहे पण पाऊस नाही असं म्हटल्यावर काहीच शिल्लक उरत नाही. जगाला सचेतन, सुंदर करणारा पाऊस, चराचरांमध्ये, अवघ्या जीवनसृष्टीमध्ये पशुपक्षी, वनस्पती, सृष्टी, धनधान्य या सगळ्यांना दर एक वर्षाला नवजीवन देऊन समृद्धीकडे घेऊन जाणारा आहे. नदीनाले, ओहळ, तलाव, धरणं सगळं उभं करून सृष्टीला चैतन्य देणारा, मातीतून मृग नक्षत्रात दरवळ पसरवून अन्नाचा घास निर्माण करणारा पाऊस. पाऊस नसला तर संबंध देश, जग कोसळून पडणार. सगळी लख लख केवळ पावसामुळेच आहे. रिमझिमता हलका पाऊस, धो-धो बरसणारा पाऊस, मातीला – सृष्टीला चिंब करून प्रियकर- प्रेयसीच्या मनातलं घर सुंदर करणारा पाऊस. स्वाती नक्षत्र, आणखी कधी येणारा, रात्रीबेरात्री धुसमुसळा येणारा पाऊस. या सगळ्याच क्षणांचं… पाऊसपाण्याचं सुंदर चित्र कवी अजितसिंह चव्हाण यांनी या कवितासंग्रहामधून शब्दबद्ध केलेले आहे. वेगवेगळी पावसाची हळूवार टिपणं हळूवार रेखाटली आहेत. पाऊस जसा मनाला तृप्त करतो, तशीच पावसाची कवितासुद्धा मनाला मोहवून टाकते. त्या पावसाळी दुनियेत काही क्षण घेऊन जाते. मराठी कवितेत किती किती पावसाच्या कविता आहेत, किती किती रूपं घेऊन त्या आलेल्या आहेत. खूपच, तरीही ‘पाऊस’ शिल्लक आहेच. नवी आव्हानं देऊन ‘मला शब्दरूप करा’ म्हणून सांगणारा. तरीही अस्सल पावसाचं रंगरूप. नवं अवकाश शब्दांत बांधण्याचा प्रयत्न कवी अजितसिंह यांनी केला, तो मराठी रसिकांना आनंद देणाराच आहे.
Keywords : Ajitsinh Chavan ǀ Vachan Katta Production ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poetry books ǀ Marathi Poem


















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review