‘रुईची फुले’ हा जयदीप विघ्ने यांचा गझल संग्रह. आतल्या वेदनेला सांदणारी सर्जनाची सुई जयदीप विघ्ने या कवीकडे आहे. व्यथेला नेमका टाका देताना तो किती अलवार गोंजारतो. संयमाचा देखणा दागिना म्हणजे जयदीप विघ्ने यांची गजल आहे. समंजसपणाचा सूर सुरुवातीपासूनच वाचताना गवसत जातो. दु:खाला मिरवतानाही तो वाचाळ तांडव करीत नाही. आत्मक्लेशाला मौनाचा लेप देतो. जयदीप विघ्ने यांना माहिती आहे कि हे मौनी सावट आत्मघातकी आहे. म्हणून ते गजलेतून सहज व्यक्त होतात. रुईची फुलं सोयीची फुले असतात. हवी तिथे हवी तेव्हा भेटतात. भले ती मनाला आनंद देत नसतीलही परंतु भर उन्हात शुष्क आत्म्याला ती रिझवतात हे त्यांचं मोठेपण. जयदीप विघ्ने यांची गजल विचार करायला लावणारी आहे. ती आपल्याला चिंतनाच्या पातळीवर अलगद नेवून सोडते, विचार करायला लावते.
एक डोळा झाकतो अन नेम धरतो
सावजावर का शिकारी प्रेम करतो..?
वाणवा दरसाल आहे पावसाची
मायच्या डोळ्यातुनी मग कोण झरतो ..?
Keywords : Jaydeep Vighne ǀ Maitri Publication ǀ Marathi Gazal ǀ Marathi Gazal Sangrah ǀ Marathi Gajal ǀ Marathi Ghazal

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review