प्रयोगशीलता हे कथेचं अंतिम मूल्य मानणाऱ्या लोकांनी मराठी कथेच्या पिछेहाटीला हातभार लावल्याचे चित्र आज साहित्य व्यवहारात दिसत आहे. दुसर्या महायुद्धानंतर नवकथाकार समजल्या जाणाऱ्या लेखकांनी महाराष्ट्रीयन समाजाचा व्यापक पट न दिल्याने जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्याचे काम नंतरच्या कथाकारांनी जाणीवपूर्वक केले, असे म्हणण्याचे धाडस करत असताना मराठी कथेचा बहुमुखी स्रोत आशयच असला पाहिजे, प्रयोग नव्हे; असेच येथे सांगावयाचे आहे. डॉ.प्रवीणकुमार चौगुले यांच्या कथांचे वाचन करत. असताना, वर सांगितलेली गोष्ट ध्यानात घ्यायलाच हवी. ‘शून्य…’ या कथासंग्रहातील सर्व कथा आशयकेंद्री आहेत. आशयाच्या आजूबाजूने फिरत असताना लेखक ‘आशयांतर्गत आकार’ सहजगत्या प्राप्त करतो. त्यामुळे या कथा कोणत्याही अर्थाने पाल्हाळिक न होता, चांगल्या अर्थाने वाचनीय झाल्या आहेत. कथेची लांबी x रुंदी x खोली आणि भाषा या गोष्टी डॉ.चौगुले यांनी जाणीवपूर्वक कमावल्या तर ते प्रगतीतील एक महत्त्वाचे कथाकार ठरतील, असा निष्कर्ष आपल्या हाताला लागतोच लागतो.
– जी.के.ऐनापुरे
Dr Pravinkumar Chougule, story books in Marathi, Marathi Katha Sangrah, Lalit Publication, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store, best marathi books to read, marathi books buy online, Marathi Pustak




















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review