कवी विलास कदम (कराड) यांचा स्वप्नविलास हा दुसरा कविता संग्रह. कवी विलास कदम अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत केवळ प्राथमिक शाळेतले वर्ग मोजलेले. त्यांचे कुटुंब अल्पभूधारक आणि कष्टकरी. उदरनिर्वाहासाठी ओगले ग्लास कंपनीत मजुरी पत्करली. काही काळ उपासमारीचे चटके सोसून त्यांनी काव्यलेखनाचा व्यासंग जीवापाड जपला. कारण प्रतिभा त्यांच्या रक्तात मिसळलेली आहे. त्यामुळे त्यांची कविता केवळ कल्पना, शब्दांची गर्दी करणारी, अलंकारीक सौंदर्यसंपन्न अशी कदाचित नसेलही. परंतु जे लिहिलंय ते खरं अस्सल आणि अनुभूतीला साक्षी ठेवून, कवी विलास कदमांच्या कवितेने खरा स्वयंभू काव्यबाज धारण केलाय. या छोट्या छोट्या रचना म्हणजे कमी शब्दात खूप काही भव्यदिव्य सांगून जातात आणि हे वेगळेपण त्यात दडलेल्या कवीमनाने शाबीत केलंय. इतकंच नव्हेतर मोह-माया-प्रेम, निसर्ग, अध्यात्म, पुराण, राजकारण किंवा समाजकारण या सगळ्याच विषयांना त्यांच्या प्रतिभेने गवसणी घातली आहे. तरीही कुठेही अहंभाव, बडेजावी डोकावत नाही. मात्र वापरलेली रुपकं, उपमा, अलंकार याचं अवडंबर न माजवता सहजपणे दिङ्मूढ करून टाकतात. यात निसर्ग त्यांचा केंद्रबिंदू तर अध्यात्म हा कवितेचा आत्मा आहे.विलास कदम लेखणी हातात घेतात आणि कविता कागदावर उतरवतात तेच मुळी प्रतिभेच्या रथात बसूनच, तेंव्हा शब्द गोळा करीतच ते भ्रमंती करीत असावेत. ते त्यांचं भारावून जाणं, मंत्रमुग्ध होणं, त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायीच ठरेल यात तिळमात्र शंका नाही. प्रतिभेचा आणि साहित्य निर्मितीचा शैक्षणिक पात्रतेशी अजिबात संबंध नाही हे संतकवी, अनेक ज्येष्ठ साहित्यिकांबरोबर विलास कदमांनीही सिद्ध केलंय.
-अॅड. सहदेव मखामले
Vilas Kadam, swapn vilas, Parissparsh Publication, Marathi Kavita Sangrah, Marathi Poetry Book, Marathi Poems, Kavy Sahgrah, काव्य संग्रह, Collection of Poems, Marathi Pustak, Marathi Books,Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store,



















1 review for स्वप्नविलास । Swapnvilas
There are no reviews yet.
Write a customer review