प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्य सृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. याव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते. प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची ‘रजनी’ ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर ‘दामिनी’ या मराठी मालिकेचा समावेश होतो.
तिहार या कथा संग्रहात वेगवेगळ्या पातळीवर जगणाऱ्या स्त्रियांच्या कथा आहेत. यातील स्त्रिया आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. कोण वकील आहे. कोण राजकारणी तर कोण संत. सामाजिक बंधने त्या पाळीत नाहीत तरीही कुठेतरी ती प्रथम स्त्री आहे. आई आहे. पत्नी आहे. मुलगी आहे . स्त्रियांचे अंतरंग उलगडवून टाकणारा हा कथासंग्रह.
Priya Tendulkar, Tihar story books in Marathi, Marathi Kathasangrah, Lalit Publication, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store




















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review