अमिताभ बच्चन | Amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना ‘चाइल्ड ऑफ डेस्टिनी’ म्हणतात. त्यांनी अभिनयामध्ये अशी काही कामगिरी केली आहे, ती मैलाचा दगड ठरली आहे. त्यांनी नुसता ठोकळा छाप भूमिका केल्या नाहीत, प्रत्येक भूमिका ते जगले. म्हणून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले. पण, त्यांचा हा जीवनप्रवास इतका सोपा नव्हता. त्यांना या क्षेत्रात आपल्याला प्रस्थापित करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक चढउतारांनी त्यांची अग्निपरीक्षा घेतली. पण प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले… आणि आपल्या कामाची छाप सोडली. जसे त्यांचे फॅन होते, त्यापेक्षा जास्त निंदक होते. पण त्यांनी आपल्या कामाने निंदकांची बोलती बंद केली. या चित्रपटसृष्टीतील त्यांचे मित्र, मैत्रिणी, त्यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री यांची माहिती मिळते. गांधी आणि बच्चन कुटुंबातील संबंध आणि दुरावा, अमिताभचा राजकारणातील सहभाग आणि माघार, पुन्हा चित्रपटात एंट्री. पण काही यशस्वी आणि काही फ्लॉप ठरले. एबीसीएलची निर्मिती. पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. बच्चन कर्जाच्या ओझ्याखाली सापडले. पण न डगमगता त्यातून सहीसलामत बाहेर आले. “कौन बनेगा करोडपती” हा टी.व्ही. वरील क्विझ शो ऐतिहासिक ठरला, बच्चन पुन्हा एकदा यशाच्या घोड्यावर स्वार झाले. आज ८० वर्षे वय असतानाही तरुणांनाही लाजवेल, * त्यांचा आहे. आजही त्यांचे चित्रपटातील काम उल्लेखनीय . त्यांचे आदर्श जीवन आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक , पुन्हा दुसरा अमिताभ बच्चन होणार नाही.














Reviews
There are no reviews yet.
Write a customer review