‘भावगर्भ’ काव्यसंग्रहात विषयांची रेलचेल आहे. प्रेमाचे दाखले आहेत. स्त्रीत्वाची कर्तव्ये आहेत. निसर्ग आहे, रूपकांची रेलचेल आहे. शब्दार्थाच्या विविध छटा आहेत, आत्मसन्मान आहे. लळा, जिव्हाळा आहे. प्रेमातले कच्चे दुवे आहेत, आक्रोश आहे. झोंबणारे शब्दही सामर्थ्य दाखवताना संतुलन साधताना दिसतात. मुक्तछंदातला रचनांचा मनभावन आविष्कार आहे. तपसाधनेचा सिद्धान्त आहे. आत्मविश्वास तर सहजतेने वावरतोय. आई, बाप, भाऊ, प्रियकर, समाज, रूढीपरंपरा, कर्तव्यनिष्ठा या सर्वांना कवेत घेऊन हा ‘भावगर्भ’ नटला आहे. संपन्न झाला आहे. यामुळेच काव्यसंग्रहाचे वेगळेपण चटकन नजरेत भरते यात शंका नाही.
Keywords : Bhavgarbh ǀ Samrudhi Surve ǀ Vagyadny Prakashan ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy

















1 review for भावगर्भ | Bhavgarbh
Write a customer review