छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नव्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी उपयुक्त आहे. डॉ. श्रीपाल सबनीस हे विवेकवादी विचारवंत असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सर्व बाजूंनी सखोल अभ्यास केला आहे. तसेच महाराजांच्या इतिहास संबंधाने वेगवेगळ्या प्रवाहातील विद्वानांनी केलेल्या वादविवादाचे संशोधन करून त्यातून सत्यनिष्ठ निष्कर्ष काढले आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस यांची या ग्रंथातील विवेकवादी भूमिका ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी गौरवलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्वच जनतेसाठी आणि समस्त शिवप्रेमींसाठी मार्गदर्शन करणारा ठरेल! या ग्रंथात त्यांनी सर्वच मान्यवर इतिहासकारांच्या विचारांची तपासणी करून पुराव्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शुद्धिकरणासह मांडला आहे. डॉ. श्रीपाल सबनीस हे महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिक प्रवाहांना एकात्म करू पाहणारे प्रगल्भ विचारवंत आहेत. त्यांच्या कार्यास आमच्या शुभेच्छा!
छत्रपती संभाजी महाराज






1 review for छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण–ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका
There are no reviews yet.
Write a customer review