कवी सुहास चव्हाण यांचा हा दूसरा चारोळी संग्रह. प्रेमात पडलेल्या तरुणाच्या झालेली अवस्था या संग्रहातून अनुभवायस मिळते. एका वेगळा भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह.
- खूप खोल आघात झालेत, माझ्या कोवळ्या मनावर
म्हणून तिला साकारतोय आठवणीच्या पानांवर.
- आपुलकीची नाती जशी, तोडता येत नाहीत
तशीच काळजामधली काही नावं, खोडता येत नाहीत.
- धगधगत्या आगीत सुद्धा अजून मी टिकलो आहे
जाळणं मला जमलं नाही जळणं मात्र शिकलो आहे.
या आणि अशा भन्नाट चरोळ्यांच्या हा संग्रह, ‘एक हाक हृदयातून’ या लोकप्रिय संग्रहानंतर प्रकाशित झालेला हा सुहास चव्हाण यांचा हा दूसरा संग्रह आहे.
Keywords : Suhas Chavan ǀ Marathi Charoli ǀ Marathi Charoli Sangrah ǀ Marathi Charolya





Reviews
There are no reviews yet.
Write a customer review