श्रावण गिरी यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावरील निवडक सूत्राआधारे स्वतंत्र काव्यरचना करुन कलावंत, प्रवचनकार, व्याख्याते आणि अभ्यासकांची सर्वार्थाची सोय केलीय. एका अर्थाने ज्ञानेश्वरी ग्रंथातील भूमिकेचे हे काव्यात्म भाष्य म्हणता येईल. पण संपूर्ण ज्ञानेश्वर पचवणे-अभ्यासणे हे कठिणच असले तरी ज्ञानेश्वरांच्या संतत्वाचा आविष्कार झालेल्या निवडक ओव्या श्रावण गिरी यांनी स्विकारल्या. त्याचा अर्थ नोंदला आणि त्याच तात्विक विचार सूत्रावर स्वतंत्र काव्यरचनाही केली. ही काव्यरचना ज्ञानेश्वरीच्या गाभ्याशी संवादी आहे. किंबहुना त्याच भूमिकेचा काव्यात्म विस्तारही म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर विश्वात्मक असून त्यांच्या ज्ञानेश्वरीचे योगदान धर्म, जात, पंथ, देश; यापुरते मर्यादीत नाही. कारण ज्ञानेश्वरीचे संतत्व पसायदानातून विश्वाला भिडते. ज्ञानेश्वरांचा स्वधर्म वैदिक हिंदूपुरता संकुचित नाही. त्यांचा विश्वात्मक देव आणि त्यांची विश्वकल्याणाची भूमिका मानव्याचा संपूर्ण नकाशा पचवणारी आहे. अशा विश्वात्मक भूमिकेला, आतल्या प्रतिभेच्या बळावर पेलण्याचे काव्यात्म धाडस श्रावण गिरी करु पाहतात. ज्ञानेश्वरी मधील काव्यसौंदर्य विद्वानांच्यासह लाखे रसिकांच्या मनाला व बुद्धीला प्रभावित करताना श्रावण गिरी यांचे त्यावर आधारीत काव्य कुणाला व्याख्याते, किती भावेल, हा प्रश्न मला महत्वाचा वाटत नाही. भाष्यकार, प्रवचनकार, यांच्या असंख्य पिढ्या ज्ञानेश्वरीच्या भक्तीत व प्रेमात सतत रमल्या. तीच भक्ती श्रावण गिरी यांच्या गीतरुप ज्ञानेश्वरीच्या अंशतः गीत भाष्यात अनुभवता येते.
Keywords : Dyaneshwari Kavyasaarǀ Shravan Giree ǀ Sahityavishwa Prakashan ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy ǀ Dyaneshwari Marathi books


















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review