गंधाळली माती (कवितासंग्रह)
कवी डॉ. बेंद्रे काव्याचा प्रवास करताना भाषासौंदर्य जपताना दिसतात. प्रतिमांचा, रुपकांचा आणि यमक, चेतनगुणोक्ती, अनुप्रास अलंकाराचा वापर करून कविता भाषिक सौंदर्याने साकारलेली दिसते. कविता पाल्हाळीक न वाटता कमी शब्दांत जास्त आशय व्यक्त होताना जाणवते. ‘अर्थगर्भिता’ अरूपाचेरूप साकारताना पदोपदी जाणवते. सामाजिक संदर्भ हे कवीच्या सामाजिक कार्यातून अनुभवसंपन्न होऊन व्यक्त होतात. कारण ही शिदोरी असेल तरच सृजनशीलतेला बहर येतो. नाहीतर नुसतीच बौद्धिकताही फोल ठरते. त्याला वजन प्राप्त होत नाही. अनुभूतीतून साकारलेल्या साहित्यकृती उंची गाठतात हे वास्तव सत्य आहे. ‘गंधाळली माती’ हा कवितासंग्रह त्यांपैकी एक आहे. शेवटी नदीने कसे वाहावे आणि पावसाने कसे यावे ही त्यांची स्वाभाविक रीत असते. आपण सांगू तसे ते थोडेच येणार आहेत ! तसा कवी डॉ. बेंद्रे यांचा काव्यप्रवास स्वाभाविक आहे. एवढेच ! पण तो कौतुकास पात्र आहे हे निश्चित !
Keywords : Dr. Sudhakar Bendre ǀ Snehvardhan Prakashan ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poetry books ǀ Marathi Poem


















1 review for गंधाळली माती | Gandhalali Mati
There are no reviews yet.
Write a customer review