अन्नदात्याच्या पाझरत्या दुःखाला उद्गार देणारी समर्थ कविता : जू
कवितेला साहित्याचा गौरवशाली प्रकार म्हणून मान्यता दिली जाते. कवितेत मानवी मनाची मशागत करण्याची क्षमता असते. कविता मनाची मरगळ दूर करते. मनात साचलेलं नैराश्य दूर सारते. मनाला प्रफुल्ल आणि टवटवीत ठेवते. हे विचार आशयसंपन्न, विचारप्रवर्तक कवितेच्या संदर्भात नेहमीच खरे ठरले आहेत. कष्टकरी भूमिपुत्राचे सुपुत्र कवी संदीप वाघोले आपल्या ‘जू’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून साहित्यसृष्टीत दमदार पाऊल ठेवले आहे.
शेतकरी नंदी म्हणजे बैल या राबणाऱ्या शेतीनिष्ठ, कृषकनिष्ठ जितराबाच्या जोरावर शेती कसत असतो. बैलाच्या खांद्यावर औताची जू असते, तर शेतकऱ्याच्या उरावर अवर्षणाची, नापिकीची, दलालांच्या लालसेची जू असते. कवीने याची प्रखर चीड, राग, जिव्हारी लागलेली टोचणी अचूक शब्दांत साकार केली आहे. अनेक कवितांमधून अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची ही वेदना पाझरत राहते. कवीच्या मनात कृषकाच्या दुःखाची खोल सल दडली आहे. कुठे अतिवृष्टी, तर कुठे अवर्षण या नैसर्गिक कोपाने शेतकरी हवालदिल झालाय. कवी सलामीच्या ‘खेळ’ या कवितेत म्हणतो
डोळ्यातून वाहे आसवांचे पाट
किती चालावी दुःखाची लांबच वाट
पुन्हा पुन्हा कुणब्याने कसा घालावा मेळ ?
लहरी पावसाचा कधी संपणार खेळ ?
Keywords : Joo ǀ Sandip Waghole ǀ Yashodip Publication ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy ǀ Shetichya Kavita


















1 review for जू | Joo
Write a customer review