मोसादची अकल्पित ऑपरेशन्स | Mosadachi Akalpit Operations
कोणताही देश शक्तिशाली होण्यासाठी त्याची गुप्तचर यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. जगातील अनेक बलाढ्य राज्ये फंदफितुरी मुळे लयाला गेली आहेत, याला इतिहास साक्षी आहे. काही राज्ये मात्र याला अपवाद आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा असे वाटते. कारण त्यांच्या राज्यात फितुरीला अजिबात वाव नव्हता. याला कारण त्यांची सक्षम गुप्तहेर संघटना आणि कडक शिक्षा. बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते. त्यांचे काम अतिशय उल्लेखनीय होते. कोणतीही मोहिम आखताना बहिर्जी नाईक शिवरायांना अगोदरच शत्रूंची इतंभूत माहिती पुरवायचे. त्यामुळे ती मोहीम शंभर टक्के यशस्वी होत असे. म्हणूनच बहिर्जी नाईक यांना शिवरायांचा तिसरा डोळा असे म्हणतात. याच बहिर्जी नाईक यांचा आणि त्यांच्या गुप्तहेर संघटनेचा अभ्यास मोसाद ही इझरायलची गुप्तहेर संघटना करते. त्यांना आपला आदर्श मानते. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.
मोसाद याचा अर्थ आहे साक्षात मृत्यू. आपल्या नावाला साजेसं असे काम मोसाद करते. यातील गुप्तहेर यांची देश निष्ठा, देश प्रेम, प्रामाणिकपणा इत्यादी अनेक गुण वैशिष्ट्ये अतिशय स्तुत्य आहेत. आजच्या काळातील ही दुर्मिळ, दुर्लभ अशी गोष्ट आहे. म्हणून तर मोसाद ही जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना आहे. तिचे नुसते नाव ऐकून जगातील मोठमोठे अतिरेकी, दहशतवादी यांच्या उरात धडकी भरते. एकदा का मोसादच्या हिटलिस्ट वर त्यांच्या विरोधकाचे नाव आले की तो संपला म्हणून समजा. मग तो कुठेही मोसाद सो.म्हणून तर ईझराईलकडे वाकडी नजर करून बघण्याची जगातील कोणाचीही हिम्मत होत नाही. अमेरिके सारखे जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रही दहशतवादी कारवाया विरूद्ध मोहिम आखताना मोसादचा सल्ला घेते. यातच मोसादचे श्रेष्ठत्व दिसून येते.
मोसादची सर्वच ऑपरेशन्स अकल्पित , एखाद्या फिल्मलाही लाजवतील अशी आहेत. मोसादचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते निरपराध लोकांना त्रास देत नाहीत. धक्का लावत नाहीत. मात्र आपल्या शत्रूंची गय करत नाहीत.
मनात येत आपल्या भारत देशात अशी संघटना कधी निर्माण होणार… रॉ ही आपली गुप्तहेर संघटना आहे. पण ती इतकी प्रभावी नाही. याला कारण आहे देशातील भ्रष्ट राजकारण, जाज्वल्य देशभक्तीचा अभाव… म्हणून तर पाकिस्तान आणि चीन सारखे आपले शेजारी देश आपल्याला नाहक त्रास देत आहेत… आणि आपण म्हणजे देशाचे नेतृत्व ते निमूटपणे सहन म्हणूनच मोसादचे काम हे अतिशय उत्कृष्ट आहे. शत्रूलाही हेवा वाटावा असे.























Reviews
There are no reviews yet.
Write a customer review