कृष्णाकाठच्या निसर्गाशी श्री. अजितसिंह चव्हाण यांचे कविमन एकरूप झाले आहे. या निसर्गातल्या प्रतिमांनी या कवीच्या अनुभूतीला आपली सर्जनशील भाषा दिली आहे. ‘कोवळी उन्हे झेलित आकाश नाचवत, दवात चिंब भिजलेला’ त्यांच्या कवितेचा पक्षी ‘हळव्या आभाळात, पंख फडफडवीत, शिळ घुमवीत’ उंच उडतो. निसर्गसौंदर्याचा हा बहर श्री. अजितसिंह चव्हाण यांनी आपल्या अनुभूतींनी अलगद झेलला आहे. ‘तेथे जाण्या नागमोडी लाल वळणाची वाट आहे’ अशी ओळ आधी येते. तरुण स्त्रीच्या धुंद चालीचा नागमोडी ठसका या ओळीत जाणवतो आणि त्याक्षणी दुसरी ओळ येते. ‘पाण्याच्या वळणाला पदराचा काठ आहे’ हा ‘पदराचा काठ’ अनुभूती सशरीर जिवंत करतो. उत्कट इंद्रियसंवेदनांनी भारलेल्या प्रतिमा हे श्री. अजितसिंह चव्हाण यांच्या कवितेला लाभलेले वरदान आहे.
Keywords : Ajitsinh Chavan ǀ Vachan Katta Production ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poetry books ǀ Marathi Poem

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review