सरवा | Sarva

सरवा | Sarva

(1 customer review) 0 sold

Original price was: ₹150.00.Current price is: ₹100.00.

  • Book name: सरवा
  • Languageमराठी
  • Author: प्रा.महादेव श्रीराम लुले
  • Publication : परिसस्पर्श पब्लिकेशन
  • Categoryकविता संग्रह
  • ISBN: 978-81­-955782-3-8
Available : 15 Sold : 0

15 in stock

सरवा

Original price was: ₹150.00.Current price is: ₹100.00.

Available : 15 Sold : 0

15 in stock

Add to cart
Buy Now
  • Size Guide

    Size Guide

    ABOOK 5.5×8.5× IN. (13.97×21.59 CM)
    BBOOK 6×9 IN. (15×23 CM)
    CSMALL SQUARE BOOK 7×7 IN. (18×18 CM)
    DLEGACY STANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    ESTANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    FSTANDARD LANDSCAPE BOOK 10×8 IN. (25×20 CM)
    GLARGE LANDSCAPE BOOK 13×11 IN. (33×28 CM)
    HLARGE SQUARE BOOK 12×12 IN. (30×30 CM)
    IMAGAZINE DIMENSIONS 8.5×11 IN. (22×28 CM)
  • Delivery Return

    Delivery

    We ship books to all states in India.

    We send tracking numbers of all orders by e-mail.

    Always Free Shipping on orders above Rs.1500/-

    During sale periods and promotions the delivery time may be longer than normal.

    Return

    We aim towards complete customer satisfaction. In case you’re not happy with any products you have purchased, you can simply return the item(s) and we’ll send you a replacement or refund your money.

    You can return an item to us, provided you do so within a 5 day window. If your order has been placed online, please email us at cs@parissparsh.com for a refund or exchange provided on the order receipt.

    Please read our Returns and exchange information and instructions as well as our terms and conditions carefully -:

    1. Items should be in their original condition

    2. Items should be ideally in the original packaging

    3. Items should be returned within 15 days of the day you bought them with a receipt

    How to return an item by post

    We recommend you to use a registered mail service that includes insurance for your returns. We can only give you a refund or exchange if we receive the items.

    1. Tell us why you’re returning the item(s) and whether you want a refund or a replacement.

    2. Post your item back to us.

    Parissparsh Publication

    Flat No.101, Maithili Residency, Ayodhya Nagari, Near Gokhale Library and Shriram Mandir, At Vidyanagar (Saidapur) Tal.Karad Dist.Satara- MH-415124

    Email : cs@parissparsh.com

    In case or order cancelation we will refund full order value within a week.

    Damaged or incorrect items

    If your item arrives damaged or we send you the wrong item, we apologize for the inconvenience. You’ll be refunded for the original item price.

    REFUND METHOD:

    We’ll make the refund to the card/method that was used to pay for the original order.

    For more information on ordering items from cs@parissparsh.com  please read our terms and conditions.

    In case you still have any further questions or clarifications please email us at cs@parissparsh.com or contact us at Mob: +919551701801

    Help

    Give us a shout if you have any other questions and/or concerns.
    Email: cs@parissparsh.com
    Mob: +919551701801

  • Ask a Question
Compare
सुरक्षित तपासणी

Free

Worldwide Shopping​

100%

Guaranteed Satisfaction

30 Day

Guaranteed Money Back

Frequently Bought Together

Price for all: 410.00

काव्य लिखाण करणे ही एक उपजत कला आहे. ज्या व्यक्तीकडे ती कला आहे ती व्यक्ती आपले विचार, आपल्या भोवतालची परिस्थिती व आपले मन कवितेत उतरवत असते.

सुगी सरुनिया गेली, पिक सोंगलं परवा

चला चला ग बायांनो, चला येचू ग सरवा (कविता: सरवा)

                किंवा

महाग झाले होते, भाकरीच्या घासाले

म्हनून लटकले दोघबी, भाकरीसाठी फासाले. (कविता: भाकरीचा फास)

प्रा.महादेव लुले यांचा ‘सरवा’ कवितासंग्रह शीर्षकापासून ते शेवटापर्यंत वाचताना लक्षात येते की शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे आनंद, एकंदरीत त्यांचे जगणे हे कवी महादेव लुले यांच्या कवितेचे प्राणतत्त्व आहे. ते त्यांच्याच बोलीभाषेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ झाले आहे. शिवाय वैदर्भीय बोली भाषेतही समृद्ध भर पडली आहे. एकंदरीत गीत, अंगाई, पाळणा, ओव्या, अभंग, मुक्त्तछंद, पोवाडा, बालकविता, लघुकविता, अष्टाक्षरी इत्यादी अनेक काव्यप्रकार या संग्रहात आहेत त्यामुळे कविता एकसुरी वाटत नाहीत.संत साहित्यामध्ये मुख्यत्वे हाताळलेला मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ओव्या!

आठवी माई ओई गं । आई तुया कष्टाले ॥

अळानी असून  शिकोते । घळी घळी ते बाळाले (ओव्या)

आईचे संपूर्ण स्वरूप, स्वभाव, प्रेम विषयक भावना त्यांनी ओव्या या प्रकारात रचल्या आहेत. आईला आदिशक्त्तीचे रूप मानलं आहे. स्वत:च्या लुगड्याची झोळी करून प्रेम देणारी आई, स्वत:चे आई दूध आटल्यावरही पीठ कालवून लेकराला भरवणारी आई, सर्व भावंडांना एकसमान प्रेम देणारी आई, कष्ट करणारी आई, स्वत: अडाणी असूनही आपल्या लेकराला ज्ञान देऊन घडवणारी आई या ओव्यांमधून साकारलेली दिसते. आई विषयीच्या अनेक कविता या संग्रहात आहेत.

मायच्या काखीत, लेक लानच रायते

माय गेल्यावर चव, दुधाची कयते.(कविता: मायची किंमत)

कविता हा अल्पाक्षरी प्रकार आहे. लुले यांच्या अनेक कविता अल्पाक्षरी आहेत.

कविते चांन्याच्या दुनियेत वावरू तरी कसा?

ग्रह नक्षत्र त् सबनच पलटले.(कविता: ग्रह)

                 किंवा

पांढरा चंद्र काया डाग, माऊलीच्या इभ्रतिचा तो राग

तरी बी मी आम्ही पुजतो कर्वाचोथले तोच चंद्र..(कविता: डाग)

 किंवा

रक्त्त आटते, घामाले बी भेटते, कवडीमोल  (हायकू: बाप आमचा)

‘वांझोटा पाऊस’, ‘समतेच्या झाडाच्या पाल्यापासून बनवलेली लस’, ‘शाकाहारी जीभ’ अशा काही नवीन प्रतिमांची भर या कवितांमध्ये घातलेली दिसते. ‘बिब्बा घालणे’, ‘तीन तेरा वाजणे’ ‘काळ गेला वेळ गेली’ इत्यादी अनेक म्हणीं वाक्यप्रचारांचा उपयोग या संग्रहातील कवितांमध्ये केलेला आहे. अलीकडच्या काळात ‘व्हायरस’ हा अतिशय प्रसिद्ध झालेला शब्द; परंतु या नावाची संग्रहातील कविता मात्र खूप वेगळी आणि मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कविता म्हणून गणली जावी इतकी खोल आहे. शाळेतल्या जिवाभावाच्या मित्रांमध्ये वाढत्या वयानुसार वेगवेगळ्या जाती धर्मांत निर्माण झालेली कटुता आणि वाढलेली दरी ‘व्हायरस’ या कवितेत उत्कृष्टरित्या दाखवून दिलेली आहे.‘सातबारा’ या कवितेत शाळेत येऊन शिकणाऱ्या मुलाचे  प्रातिनिधिक गार्‍हाणे शिक्षकाकडे मांडलेले आहे.

मोबाईलातच भरते वर्ग, शाळा शिकनं घरुनं

तुमचा आमचा समंध, फक्त दुरून दुरून..(कविता: फक्त लळ म्हना)

ऑनलाइन शिक्षणाचे बरे वाईट परिणाम दाखवताना ‘फक्त लढ म्हना’ या कुसुमाग्रजांच्या अत्यंत गाजलेल्या कवितेचा आधार घेत ‘फक्त लळ म्हना’  ही कविता लिहिलेली आहे. फार जोडाक्षर नसलेल्या, बालकांना आवडतील  आणि सहज गाता येतील अश्या लयबद्ध बालकविता या संग्रहात आहेत.उदा.

जिकळे तिकळे, पानीच पानी

आनंद झाला, माह्या मनी

शाळेले सुट्टी, दिवसभर…

(बालकविता: पावसाची सर)

समाजभान, निसर्गभान, मानवतावाद याचे भान राखत आशय आणि अभिव्यक्त्ती यांनी परिपूर्ण असलेल्या अंगाई, अनाथ, देव, पोरी, नार, दिवाळी, नदी, दारू, गरीबी, माणुसकी, साहित्य-संस्कृती, बालपण, अवकाळी पाऊस, पाण्याचा अभाव, कोरोना, संमेलन, राजकारण अशा अनेक विषयांवरील कविता या संग्रहात आहेत.’दोन बायका फजिती आयका’ यासारख्या हसून हसून पोट दुखेल अशा विनोदी कवितांपासून ‘धोंडी’ यासारख्या डोळे पाणावतील इतक्या दर्दभऱ्या कविता या संग्रहात आहेत. आपल्या या मातृभाषेचा, आपल्या भूमीचा अभिमान शब्दाशब्दातून जागवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत.

असा हा विदर्भ आमचा देस, रंगारंगी त्याचा हाये वेस

देवबाबू पोवाळ्यात गातो गुन येस, जी जी जी! (वऱ्हाडाचा पोवाळा)

किंवा

अवघ्या भाषेत गुयचट, तिले सागराची खोली

आमची वऱ्हाडी बोली, म्हंजे गुयाची भेली. (कविता: आमची वऱ्हाडी बोली

 गुयाची भेली )

एकंदरीत काय तर वऱ्हाडी बोलीतील कविता जरी असल्या तरीही त्या प्रत्येक मराठी भाषिक वाचकाला त्या पूर्णपणे समजतातच! याचे मुख्य कारण त्यांच्या कवितांमध्ये ‘आकलन सुलभता’ हा महत्त्वाचा गुण आहे.

कवितासंग्रहाचे शीर्षक जरी ‘सरवा’ असले तरी उत्कृष्ट बौद्धिक खाद्य पुरवणार्‍या, चिंतन करायला लावणाऱ्या आणि उत्तम जीवनदृष्टी देणार्‍या कविता या संग्रहात आहेत आणि म्हणूनच कविताप्रेमी रसिक नक्कीच याचे भरभरून स्वागत करतील, अशी आशा व्यक्त्त करते!

-प्रा. प्रतिभा सराफ, मुंबई 

Publisher

Number of Pages

Binding

Author Name

Mahadev Shriram Lule

1 review for सरवा | Sarva

There are no reviews yet.

Write a customer review

Be the first to review “सरवा | Sarva”

Review now to get coupon!

Frequently Bought Together

Price for all: 410.00

Select at least 2 products
to compare