लोकशाही गणव्यवस्थेतही आदर्श ठरणारा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
खंडप्राय असणाऱ्या भारतवर्षात गेल्या चार हजार वर्षात अनेक राजघराण्यांमधील हजारो राजांनी राज्य केले. परंतु आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच राजे-महाराजे लोकांना ज्ञात आहेत. आजही प्रेरणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांपैकी एक आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वी होवून गेलेले छत्रपती शिवराय हे पिढ्यान्पिढ्या मराठी माणसांचे प्रेरणास्थान, आदर्श आणि स्वाभिमान म्हणून हृदयसिंहासनी विराजमान झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयजयकाराचा विषय किंवा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय राहिलेले नाहीत, तर गंभीरपणे मनात व बुद्धीत (डोक्यात) घेण्याचे असाधारण व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. जरी काही स्वार्थी राजकारणी व धर्मांध लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर दलित- मुस्लिमांच्या विरोधात भडकविण्यासाठी करत असले, तरी प्रत्यक्ष ऐतिहासिक वास्तव वेगळे होते, हे अनेक अभ्यासकांनी मांडले आहे. प्रस्तुत छोटेखानी पुस्तकातून ‘घोड्यावर मांड ठोकून तलवार परजणारा राजा’ असे पारंपारिक चित्र रेखाटलेले नाही, तर ‘प्रजाहितदक्ष, अष्टावधानी, सर्व धर्म सहिष्णू, कर्तव्यतत्पर, स्त्रियांचा कैवारी असणारा ‘आदर्श राजा’ असे चित्र निर्माण केले आहे. तेही ‘आज्ञापत्र’ आणि इतर संशोधन ग्रंथांच्या आधारे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.
Keywords : Anil Keskar, Ravi Sangolkar ǀ Mahitipar ǀ Rashtra Seva Dal ǀ marathi informative books ǀ marathi information Pustake ǀ Shivaji Maharaj ǀ Chatrapati Shivaji Maharaj













Reviews
There are no reviews yet.
Write a customer review