‘स्मशानातील दारू’ या कथासंग्रहात गूढ, विनोदी, मार्मिक, ग्रामीण, रहस्य तसेच वैज्ञानिक अश्या वेगवेगळ्या रंगछटा असलेल्या कथा आहेत, यातील सर्वच कथा काल्पनिक आहेत. कथा जरी काल्पनिक असल्या तरी व्यक्ती आणि समाज यांच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करणाऱ्या आहेत.
संग्रहातील ‘स्मशानातील दारू’ ही शीर्षक कथा ग्रामीण जीवनशैली व तेथील चालीरीतीवर आधारित असली तरी समाजाने कुचंबणा केलेल्या मनाचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो हे कथेतील ‘काल्या’ हे पात्र दाखवते.
‘माठातील पाणी’ ही पहिली कथा आई आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी आहे. जी वाचताना वाचकांच्या डोळ्याला आपसूकच पाणी येते. ‘यशस्वी माघार’ ही एक रहस्य कथा आहे. त्याविषयी इथे सांगणे योग्य नाही. ते रहस्य कथा वाचून जाणून घेणं जास्त योग्य ठरेल.
‘भूत घटना’ व पांडुरंग! पांडुरंग!!’ या विनोदी कथा असून कथेत विनोदाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर व्यंग केले आहे. बाकी ‘संस्कारी बाप’ ही निखळ विनोदी कथा आहे. त्यात हुशार बाप व मुलांचा संघर्ष दाखवला आहे.
‘भूताली’ ही कथा गूढ कथा असून ग्रामीण भागात कथीत काळी विद्या यावर भाष्य करणारी आहे. या कथेत ग्रामीण भाषेचा साज आहे जो वाचकांना सहज समजेल. ही एक गूढ कथा असल्याने या कथेचा शेवट वाचकांना अर्धवट किंवा विचित्र वाटू शकतो.
‘राघव जुळे’ ही रहस्य मय विज्ञानकथा आहे. कथेत रहस्य असल्याने कथा वाचूनच त्याचा वाचकांनी आस्वाद घ्यावा. आपले कर्ज फेडण्यासाठी खोट्या आश्वासनांवर कधी अवलंबून राहू नये. नाही तर काय अवस्था होते. याचे मार्मिक वर्णन करणारी ‘स्पष्ट नकार’ ही कथा चांगला संदेश देते.




















1 review for स्मशानातील दारु | Smashanatil Daru
Write a customer review