कवी शरद पाटील यांचा हा दूसरा दुसरा चारोळी संग्रह. प्रेमात पडलेल्या तरुण युवकाच्या मनातील भाव भावना या संग्रहातून कवी शरद पाटील यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.
- ती म्हणाली सुखी रहा, मला घरचं बंधन आहे
पण तिच्या सुखासाठीच, माझं आयुष्य आंदन आहे
- प्रिये तुझे केस जेंव्हा, चेहऱ्यावरती झुकतात
माझ्या वेड्या काळजाचे, ठोके हळूच चुकतात
- पावसाची ओली सर, नेहमीचं गळकं घर
आधी मी ओंजळ धरतो, नंतर तू ओंजळ धर
- कितीही दु:ख लपविलं तरी, डोळ्यातील पाणीच खरं वाटतं
मग दारात उभं राहण्यापेक्षा, पावसात भिजलेलं बरं वाटतं
या आणि अशाच भन्नाट रचनांची मांडणी या संग्रहातून कवी शरद पाटील यांनी केलेली आहे.
Keywords : Sharad Patil ǀ Marathi Charoli ǀ Marathi Charoli Sangrah ǀ Marathi Charolya





Reviews
There are no reviews yet.
Write a customer review