कुठलाही शेतकरी वर्षभर आपल्या शेतावर कष्ट करतो. मात्र हंगामाच्यावेळी, काढणीच्यानंतर त्याच्या हाती फारसं उत्पन्न उरत नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांप्रमाणेच ऊस उत्पादक बागायतदार शेतकर्यांची सुद्धा अशीच अवस्था होते. याचे वर्णन श्रीकांत पाटील यांनी आपल्या ‘ऊसकोंडी’ या कादंबरीत केल्याचे दिसून येते. ऊस उत्पादक शेतकरी मनुदा, त्याचे वडील आबा, पत्नी शीतल या कुटुंबाच्या, विविध पात्रांच्या आणि घटना – प्रसंगांच्या माध्यमातून ही ‘ऊसकोंडी’ मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
कादंबरीचा नायक मनुदा हा ‘ऊसकोंडी’ ने पुरता त्रस्त आहे. तो दोन दिवस जेवतपण नाही. त्याचे हाल त्याची पत्नी शीतलला पाहवत नाही. पण तिचाही नाईलाज असतो. आबासुद्धा पुरते हादरून जातात. आपल्या पोराची तडफड त्यांनाही पाहवत नाही. “पोरा, बस करू या, ह्यो ऊसाचा नाद. त्यापेक्षा आपण खरीप आणि रब्बीची पारंपरिक शेती करू या…, असे ते म्हणतात. त्यांच्या या निर्णयावर मनुदा म्हणतो, “मला पण तसंच वाटायला लागलंय. मुलखाचं महाग बियाणं आणायचं. महागडी खत घालायची. तीन-चार वेळा औषधं मारायची. दीड-दोन वर्षे सापाच्या वेटोळ्यावर पाय ठेवून पाणी पाजायचं. गड्यामाणसास्नी फुलावाणी जपायचं अन् आपल्या पदरात काय? यावरून त्याची बिकट अवस्था झालेली कळून येते.
मात्र असं असलं तरी कुठेतरी त्याला विश्वास असतो की हेही दिवस जातील. नक्की चांगले दिवस येतील, ही आशा बाळगून पुन्हा नव्या जोमाने तो नव्या खोडव्याची निगराणी करण्यासाठी ऊसशेतीकडे वळतो. हा साखरफेरा अनुभवूनसुद्धा साखरपेरा जगवण्यासाठी तो नव्या जोमाने शेतीकडे कसा वळतो आणि कामाला लागतो, याचे वर्णन करण्याचा प्रयत्न लेखकाने ‘ऊसकोंडी’ या कादंबरीत केलेला दिसून येतो. तो वाचकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
– डॉ. सदानंद देशमुख
Dr Shrikant Patil, Shreekant Patil, Ooskondi, Kadambari books in Marathi, Marathi Kadambari, Lalit Publication, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store, best marathi books to read, marathi books buy online, Marathi Pustak



















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review