एक दमदार विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो. यशस्वी होण्यासाठी माणसाला फक्त एका दमदार विचाराची गरज असते. या पुस्तकातील शब्द तुमच्यात दमदार विचारांची निर्मिती करू शकतात. ज्यांच्याकडे शक्तिशाली विचारांबरोबरच आत्मविश्वास, इच्छाशक्ती, व्यवहारज्ञान, सुनियोजित योजना, चातुर्य आणि मन:शक्ती आहे ते या जगात फक्त आर्थिकच नाही तर मानसिक, शारीरिक, सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त करून सर्वांग श्रीमंत बनू शकतात.
जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पैशाशिवाय माणूस या जगात राहू शकत नाही. येथील प्रत्येक गोष्टीला एक किंमत आहे. जीवनात जर अर्थ असेल तरच जगण्यात आणि मरण्यात अर्थ आहे. काही लोकांचा असा समज असतो, की केवळ पैशानेच पैसा मिळविता येतो, किंवा श्रीमंत लोकच पैसे मिळवितात पण अशी माणसे हे विसरतात, की जबरदस्त इच्छा हे एक असं माध्यम आहे की ज्याद्वारे तुम्ही खूप पैसे मिळवू शकता. पैसा हा एक निर्जिव पदार्थ आहे जो चालू शकत नाही, बोलूही शकत नाही पण तो ऐकू शकतो. तुम्ही फक्त मनापासून म्हणा ‘येरे येरे पैसा”… पैसा तुमच्याकडे पळत येईल!
Sachin Patil, Money Investment Guidance books in Marathi, Lalit Publication, Marathi lekh Sangrah, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store
Reviews
There are no reviews yet.
Write a customer review