उत्तरांच्या वाटेवर
प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त हुशार असते. प्रत्येक पिढीचे गुणधर्म वेगळे असतात. कौटुंबिक पार्श्वभूमी, आसपासचा परिसर, शाळा/शिक्षणसंस्था, मिळालेल्या संधी यावर मुलांची जडणघडण अवलंबून असते. सध्याची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती वेगाने बदलते आहे. याचा सहज परिणाम मुलांच्या वाढीवर होतो. मुलं आपल्या पद्धतीने मोठी होत असतात. शाळेत, घरात स्वत:च्या स्वतंत्र पद्धतीने वाढत असतात. त्यांचं वागणं त्यांच्या परीने नैसर्गिक असतं. पण पालकांना मात्र ते प्रश्न वाटतात. अशा प्रश्नांकडे कधी दुर्लक्ष केलं जातं, तर कधी त्यांचा पाठपुरावा केला जातो.
प्रश्न आणि समस्यांची ही वाट नेहमीच अवघड नसते. कधीकधी चुटकी सरशी हे प्रश्न सुटतात देखील. झटपट उत्तरं सापडून जातात. मुलं वाढवताना प्रश्न उत्तरांचा खेळ सततच खेळावा लागतो. उत्तरांच्या वाटा शोधताना, या पुस्तकातला संवाद उपयोगी ठरेल, या विश्वासासह!
अंतरंग
- मनातलं… मुलं कधीच आपणहून अभ्यासाला बसत नाहीत.
- मुलं उलट बोलतात.
- मूल घाबरट आहे; सतत कशा कशाची भीती वाटत असते?
- शाळांना मोठ्या सुट्ट्या लागतात, तेव्हा अशा सुट्ट्यांमध्ये नेमकं काय करावं?
- पाळणाघर हवं की नको?
- मूल नीट जेवत नाही.
- मुलांवर खूपदा हात उगारला जातो.
- तो/ती घरात मनमोकळेपणानं बोलत नाही.
- इंग्रजी माध्यमाचे तोटे काय?
- शाळेचे नियम अतिशय कडक आहेत.
- मूल अभ्यासात चांगलं आहे; पण लिहिण्याचा फार कंटाळा आहे.
- मूल होऊच नये असं वाटतं.
- मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या?
- मूल दत्तक घेतलेलं आहे; पण समस्या आहेत.
- मुलं वायफळ खर्च करायला भाग पाडतात.
- मूल टीव्ही सोडत नाही.
- सिनेमातले संवाद पाठ; पण…
- मुलांनी काय खेळावं?
- ‘एकटं मूल’ ही समस्या आहे का?
- मुलांना बालपण मिळत नाही.
- ठराविक विषयांचाच अभ्यास करावासा वाटतो.
- गृहपाठ नव्हे; ‘ओझं’.
- आपण योग्य वागतोय ना?
- मुलाला मराठी माध्यमात घातलं आहे; पण…
- संगत चांगली नाही.
- मूल आनंदी आहे का?
- मूल डाव्या हाताचा वापर करतं.
- मुलाला/मुलीला मुळीच शिस्त नाही.
- मूल पाळणाघरात राहत नाही.
- रिक्षात जास्त मुलं कोंबतात.
- मुलींची काळजी जास्त वाटते.
- शाळेत जायला आवडत नाही.
- मुलं अभ्यासात मागे का राहतात?
- कशातच स्थिरता नाही.
- प्रेम मिळालं नाही तर…
- स्पर्धेच्या युगात सर्वच मुलांचा निभाव कसा लागेल?
- मुलं स्वयंकेंद्रित होताहेत.
- मूल मुलांमध्ये रमतं.
- मुलांना मैदानावर खेळायला पाठवावं का?
- संस्कारवर्गांची फॅशन योग्य आहे का?
- क्वालिटी टाइम!
- परीक्षेची भीती का वाटते?
- अवांतर वाचन का आवश्यक आहे?
- आत्मविश्वास निर्माण होणं गरजेचं
- मूल ओळखायला हवं
- दुर्लक्षही करायला हव.
- अपंग मूल स्वीकारायच असतं तेव्हा…
- एकत्र कुटुंबातलं मुलाच वाढणं समस्या निर्माण करतं तेंव्हा…
- मूल हट्टी का होतं?
- मैत्री मुलांशी – त्यांच्या वयाशी!
Uttranchya Vatevar, Shruti Panase, Unmesh Prakashan,Balsahitya Marathi Pustak,lahan mule Ashi ka Vagtat ?, Lahan Mulanchya Vagnyatil Balachi karane, Lahan Mulanchya Palkani Kase Vagave, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review